जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जानव्ही हॉटेल ते रिलायन्स पेट्रोल पंप दरम्यान झालेल्या विचित्र अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता स्विफ्ट डिझायर कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते भुसावळ रोडवर असलेल्या जानव्ही हॉटेल ते रिलायन्स पेट्रोल पंप दरम्यान ११ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रमांक (एमएच १९ डीयु ६८२७) वरील चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या फॉर्च्यून कार क्रमांक (एमएच ०१ डीजे ९००१) याला धडक दिली. त्यानंतर पुढे जाऊन आयशर ट्रक (एमएच १२ सीटी २४४९) याला मागून धडक दिली. यामध्ये स्विफ्ट डिझायर मधील कार चालक हा जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. परंतु या अपघातामध्ये आयशर ट्रक, फॉर्च्युनर कार आणि स्विफ्ट डिझायर कार या तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात गुरुवार १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सागर राजेश पाटील (वय-२३) रा. नशिराबाद या तरुणाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात (एमएच १९ डीयु ६८२७)या कारवरील अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.