पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आज मुंबई येथे राजभवनात गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाचोऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके वाजवत, घोषणा देत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून त्यामध्ये भाजपाचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे आमदार गिरीश महाजन यांना देखील पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मुंबई येथे राजभवनात गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाचोऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके वाजवत गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे भरवले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले की, “जळगाव जिल्ह्यातील मागील अडीच वर्षात रखडलेली विकास कामे आता मार्गी लागतील तसेच गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा आता विकासाच्या दिशेने वाटचाल करेल.”
यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, दिपक माने, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, भैया ठाकूर, राहुल गायकवाड, विरेंद्र चौधरी, जगदिश पाटील, प्रशांत सोनवणे, गौरव बोरसे, मुस्लिम बागवान, विनोद पाटील, भावेश पटेल, भैया चौधरी, अनिल चांदवानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.