…मग बाबरी कुणी पाडली ? : ओवेसी यांचा सवाल

नवी दिल्ली । बाबरी प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निकालावर एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीकास्त्र सोडत जर ३२ जणांनी बाबरी पाडली नाही तर कुणी पाडली ? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज सर्वच्या सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ही घटना पूर्व नियोजीत कट नसल्याचे नमूद करत हा निकाल सुनावण्यात आला. यावर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? २८ व २९ डिसेंबरच्या रात्री त्या ठिकाणी जादू करून मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या का? राजीव गांधी पंतप्रधान असताना जादूनं कुलूप उघडण्यात आलं होतं का? त्यामुळेच मी म्हणतोय की, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं होतं, त्याच्याविरोधात हा निकाल आला आहे. जर तुम्ही हिंसा कराल, तर तुम्हाला मिळून जाईल, असं यातून दिसतं. अडवाणींची रथयात्रा भारतात जिथे कुठे गेली, तिथे हिंसा झाली. लोकांच्या हत्या झाल्या. संपत्ती जाळण्यात आली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आज न्यायालयाचा निकाल येतो की ती घटना स्वयंस्फूर्त नव्हती. मग आम्ही विचारतो की, मग स्वयंस्फूर्त असण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.

Protected Content