बिग ब्रेकींग : राहूल गांधी यांची खासदारकी रद्द !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी खासदारकी आज रद्द करण्यात आली आहे.

खासदार राहूल गांधी यांना कालच सूरत न्यायालयाने बदनामीच्या प्रकरणात दोन वर्षे शिक्षा सुनावली होती. याप्रसंगी त्यांना तात्काळ जामीन देखील मंजूर करण्यात आला होता. तर, यासोबत त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मंगळवार पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आज यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विद्यमान नियमानुसार दोन वा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लोकप्रतिनिधी अपात्र होत असतो. याच नियमानुसार लोकसभेच्या सभापतींनी आज राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची घोषणा केली असून यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Protected Content