बिग ब्रेकींग : चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार; हल्लेखोर फरार

चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजी माजी नगरसेवकावर अज्ञात पाच हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आहे.

यासंदर्भात मिळालेले माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करून जीवघेणा हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील देवरे हॉस्पिटल समोर बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात एका कारमधून पाच जण उतरले. त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. एका मागून एक जण असे पाच जण हातात बंदुका घेवून आल्यानंतर गोळीबार केलाय. या गोळीबारमध्ये माजी नगरसवेक बाळू मोरे थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

ही घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले आहे. याचे गंभीर दखल घेत चाळीसगाव पोलीसांनी कसुन चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

चाळीसगावमध्ये अलीकडेच शुभम अगोणे या पोलीस दलात कार्यरत असलेल्या तरूणाच्या खुनामुळे समाजमन सुन्न झाले होते. या पाठोपाठ आता माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content