मेहुणबारे येथे तरूणाचा खून; संशयितांना घेतले ताब्यात

चाळीसगाव प्रतिनिधी । प्रेमप्रकरणातून मारहाण केलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मेहुणबारे येथे घडली. या घटनेमुळे मेहुणबारे परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्ह्यातील तीन ते चार संशयितांना मेहुणबारे पोलीसांनी अटक करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, हरीष सुभाष महाजन (वय-२३) रा. मेहुणबारे ता.चाळीसगाव हा ट्रक्टर चालविण्याचे काम करतो. याला मंगळवारी २४ जून रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास प्रेमप्रकरणातून तीन ते चार जणांना बेदम मारहाण केली. यात हरीष गंभीर जखमी झाला होता. नातेवाईकांना जखमीवस्थेत तातडीने धुळे रूग्णालयात उपचारार्थ नेत असतांना रस्त्यातच प्राणज्योती मालविली.

घटनास्थळी मेहुणबारे पोलीसांची धाव
मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन बेंद्रे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळ धाव घेतली. घटनास्थळाचा पंचानामा करण्यात आला. रस्त्यात हरीषचा मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह मेहुणबारे ग्रामीण कुटीर रूग्णालयात आणण्यात आले. ही घटना घडल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. खूनातील संशयित तीन ते चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सपोनि सचिन बेंद्रे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना दिली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content