पुण्याजवळ डिटोनेटरसह मोठा शस्त्रसाठा जप्त ; एकाला अटक

pune weapons

 

पुणे (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे. राजाराम किसन अभंग (वय ६०, रा. अभंगवस्ती, पिंपळवाडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.

 

अभंग याच्या घरात इलेक्ट्रिक गन तसेच पाइप बॉम्ब बनविले असून तलवार, कोयता, दोन भाले आणि स्फोटक बनविण्यासाठीचे साहित्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार अभंग यांच्या घरावर छापा घालत हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये पाइप बॉम्ब बनविण्यासाठी तयार केलेले स्ट्रक्चर, इलेक्ट्रिक गन, गन पावडर तसेच एका तेलकट कागदामध्ये स्फोटकांची पावडर आढळली आहे. त्याशिवाय दोन तलवारी, दोन भाले, ५९ डिटोनेटर, इलेक्ट्रिक स्विच, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक बॅटरी, हाताने तयार केलेले चिलखत तसेच एक हेल्मेट असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.अभंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्याने २००३ साली त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात काही लोक जखमी झाले होते. याप्रकरणी तो तीन वर्षे येरवडा कारागृहात कैदेत होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी अभंग याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, अभंग याचे कुटुंबीय त्याच्या सोबत राहत नाहीत. त्याचे सातवीपर्यंत शिक्षण झाले असून त्याला स्फोटके बनविण्याचे प्रशिक्षण कुठे मिळाले तसेच कुठल्या कारणासाठी त्यांनी ही स्फोटके जवळ बाळगली याचा तपास ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे.

Add Comment

Protected Content