पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पुण्यात मोठी घोषणा केली. सगेसोयरेची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा करण्यात यावा. जर हा कायदा केला नाही तर सर्व जातींना सोबत घेऊन विधानसभेला २८८ जागा लढवणार असल्याची घोषणा यावेळी जरांगेंनी केली.
तसेच येत्या 4 तारखेपासून सगेसोयरेची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा करण्यात यावा यासाठी आमरण उपोषण देखील करण्यात येणार असल्याचं यावेळी जरांगेंनी सांगितलं.