भुसावळ प्रतिनिधी । शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे पेट्रोल, डिझेल, गॅस महागाई विरोधात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रथमतः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास, ताजोद्दीनबाबा दरगाह यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करून भाजपा, मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तयार करून सायकल रॅलीची सुरवात करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व संदीप पाटिल यांच्या नेतृत्वामध्ये शहर अध्यक्ष रविंद्र निकम व जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुन्वर खान, माजी आमदार निळकंठ भाऊ फालक प्रदेश संयोजक भगवान मेढे प्रदेश महासचिव मुक्ती हारुन यांच्या जोरदार पेट्रोल डिझेल गॅस महागाई विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष सुनील जवरे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सलिम गवळी, महिला शहर अध्यक्ष यास्मिन बी. शेख तन्वीर, राम अवतार, रघुनाथ चौधरी,जेष्ठ कार्यकर्ता जे.बी.कोटेजा सागर कुरेशी, दुर्गा बाई सोनवणे, जिल्हा महिला उपाध्यक्ष राणी खरात बाळु सपकाळे, विनोद पवार इमान, ठेकेदार हमीद शेख शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे हमीदाताई गवळी रमजान खा लोटिक इसाक चौधरी जानी गवळी वसिम शेख शाहनवाज सलिम गवळी नाशिक खान रशिद. कुरेशी शरिफ शहा. सुनील रायमळे भिमराव वाघ मुकुंद टेलर शहर सरचिटणीस शैलेश अहिरे इत्यादी कार्यकतै उपस्थित होते.