अडावद विकासोच्या चेअरमनपदी भूषण देशमुख बिनविरोध

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी संस्थेच्या चेअरमनपदी भूषण वसंतराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात आज सहायक निबंधक एस.एफ. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमनपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात भूषण देशमुख यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

अडावद येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडीसाठी आज दि.१७ रोजी दुपारी १ वाजता संस्थेच्या कार्यालयात संचालक पदाची बैठक झाली. बैठकीत चेअरमन पदासाठी भूषण वसंतराव देशमुख यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, त्यास सुचक म्हणून प्रदीप पाटील यांनी तर रमेश काबरे यांनी अनुमोदन दिले. यावेळी चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी एस. एफ. गायकवाड यांनी चेअरमन पदी भूषण देशमुख यांची निवड घोषित केली.

यावेळी संस्थेचे संचालक रमेश ठाकूर, वैजंताबाई माळी, सचिन महाजन, प्रभाकर माळी, प्रदीप पाटील, प्रकाश माळी, गोटू धनगर, रामदास चौधरी, रमेश काबरे, शेख शकीलोद्दीन, शोभाबाई पाटील उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेसाठी संस्थेचे सचिव अविनाश पाटील, क्लर्क संभाजी देशमुख, प्रशांत देशमुख मदतनीस, मनोज सोनार यांनी सहकार्य केले.

Protected Content