भुसावळातील दोघे गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्यातील गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा सपाटा सुरूच असून पोलीस प्रशासनाने आता पुन्हा दोन गुंडांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

पोलीस प्रशासनाने गुंडांवर कारवाईचा धडाका कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. यातच तालुक्यातील दोन गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. मंगल देविदास कोळी (साकेगाव, ता.भुसावळ) व शेख नईम सलीम शेख (दीनदयाल नगर, भुसावळ) अशी त्यांची नावे आहेत.

मंगळवारी देखील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी नव्याने दोघांच्या हद्दपारीचे आदेश काढले. या पैकी मंगल देविदास कोळी (रा.साकेगाव) याच्यावर तालुका पोलिस ठाण्यात ५ व शहर पोलिसांत एक गुन्हा दाखल आहे. दंगल, हाणामारी व चोरी असे हे गुन्हे आहेत. दुसरा संशयित शेख नईम शेख सलीम याच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात विनयभंग, हाणामारी, जबरी लूट असे तीन गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार प्रशासनाच्या रडारवर अजून काही गुन्हेगार असून त्यांच्या हद्दीपारीचे लवकरच आदेश निघण्याची शक्यता आहे.

Protected Content