Home Cities भुसावळ नंदुरबारमार्गे धावणार भुसावळ ते बांद्रा एक्स्प्रेस

नंदुरबारमार्गे धावणार भुसावळ ते बांद्रा एक्स्प्रेस

0
34

भुसावळ प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याने नंदुरबारमार्गे भुसावळ ते बांद्रा ही साप्ताहिक एक्सप्रेस सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील अनेक कुटुंबे ही वापीसह परिसरात रोजगारानिमित्त स्थायीक झालेली आहेत. या मार्गावर सध्या पाटणा-बांद्रा व्हाया सूरत ही एकमेव एक्सप्रेस रेल्वे उपलब्ध आहे. यात आता भुसावळ ते बांद्रा व्हाया नंदुरबार या एक्सप्रेसची भर पडणार आहे.

दरम्यान, खासदार रक्षाताई खडसे यांनी विविध प्रश्‍नांवर डीआरएम आर.के.यादव यांच्याशी चर्चा केली. त्यात मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ जंक्शन स्थानकावर थांबा देणे, रावेर तालुक्यातील निंभोरा, सावदा येथील रेल्वे स्थानकांवरील सुरू असलेल्या विकासकामे, पालिकेच्या ताब्यातील काही जागांचे रेल्वेकडे हस्तांतरण आदींवर चर्चा झाली. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील, प्रा.सुनील नेवे, गोलू पाटील, रमेश मकासरे, देवा वाणी आदींची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound