Home Cities भुसावळ सूर्यवंशी यांच्या हद्दपारीची चौकशी करण्याची मागणी

सूर्यवंशी यांच्या हद्दपारीची चौकशी करण्याची मागणी

0
111

bhusawal rpi nivedan

भुसावळ प्रतिनिधी । रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना राजकीय सुडबुद्धीने हद्दपार करण्यात आले असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना नुकतेच हद्दपार करण्यात आले असून ही कारवाई राजकीय सूडबुध्दीने करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या अनुषंगाने रिपाइंतर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रकरणी गोपनीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, राजू सूर्यवंशी हद्दपारीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत आहेत. तरीही ते शहरात फिरत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जातात. याप्रकरणी पुढार्‍यांच्या सांगण्यावर प्रांताधिकार्‍यांनी कारवाई करण्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर रोहन सूर्यवंशी, लक्ष्मण जाधव, विश्‍वास खरात, प्रकाश सोनवणे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Protected Content

Play sound