पुन्हा १० दिवस रेल्वे प्रवासी गाड्या रद्द : जाणून घ्या संपूर्ण यादी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांमध्ये दोन टप्प्यात रेल्वे प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्यानंतर २० ऑगस्टपासून पुन्हा दहा दिवस काही ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. यामुळे आपण प्रवासाचे नियोजन केले असल्यास याबाबतची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

गेल्या महिन्याभरात दोनदा विविध ट्रेन्स रद्द करण्यात आल्या होत्या. यात रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या कालावधीतही काही गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. या पाठोपाठ आता २० ऑगस्ट नंतर पुन्हा दहा दिवस काही रेल्वे प्रवासी गाड्या धावणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील चौथ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी या गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, भुसावळ विभागातून त्या भागात धावणार्‍या तब्बल ३६ गाड्या रेल्वे प्रशासनाने २० ते ३० ऑगस्ट दरम्यान रद्द केल्या आहेत. त्यात हावडा मेल, शालिमार-एलटीटी सलग आठ दिवस बंद राहणार असल्याची नोंद प्रवाशांनी घेण्याची आवश्यकता आहे.

यासोबत खालीलप्रमाणे रेल्वेगाड्या तारखांनुसार रद्द झाल्या आहेत. हटिया-एलटीटी (२६,२७), एलटीटी-हटिया (२८ व २९), हावडा-शिर्डी साईनगर (२५), साईनगर शिर्डी-हावडा (२७), हावडा-मुंबई (२६), मुंबई-हावडा (२८), एलटीटी-कामाख्य (२० व २७), कामाख्य-एलटीटी (२३ व ३०), हावडा-मुंबई मेल (२१ ते २८ आठ दिवस), मुंबई-हावडा मेल (दि. २१ ते २८ आठ दिवस), अहमदाबाद-हावडा, हावडा-अहमदाबाद, शालिमार-एलटीटी व एलटीटी-शालीमार या गाड्या (२१ ते २८), हावडा-पुणे (२०,२५,२७), पुणे-हावडा (२२,२७, २९); संत्रागाची-पुणे (२० व २७), पुणे-संत्रागाची (२२ व २९), शालिमार-पोरबंदर (२६ व २७), पोरबंदर-शालिमार (२४ व २५), पुरी-जोधपूर (२४), जोधपूर-पुरी (२७), शालिमार-ओखा (२३ व ३०), ओखा-शालिमार (२१ व २८), मालदा टाऊन-सूरत (२० व २७), सूरत-मालदा टाऊन (२२ व २९), हावडा-पुणे- हावडा (दोन्ही बाजूची २१ व २८), संत्रागाची-पोरबंदर (२८), पोरबंदर-संत्रागाची (२६), संत्रागाची-एलटीटी (२६ व २७), एलटीटी-संत्रागाची (२४ व २५), भुवनेश्वर-एलटीटी (२२,२५,२९), एलटीटी-भुवनेश्वर (२४,२७ व ३१) याप्रमाणे रेल्वे प्रवासी गाड्या बंद राहणार आहेत.

Protected Content