Home Cities भुसावळ भुसावळच्या रेल्वे विभागाने पटकावली पाच पारितोषिके

भुसावळच्या रेल्वे विभागाने पटकावली पाच पारितोषिके

0
37

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे विभागास विविध क्षेत्रांमधील भरीव कामगिरीसाठी पाच पारितोषीके मिळाली आहेत.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या ६४ व्या रेल सप्ताह समारंभात भुसावळ रेल्वे विभागाला उत्कृष्ट कार्याबद्दल पाच शिल्ड व पारितोषिक मिळाले आहेत. भुसावळ विभागाला सुरक्षा,कार्मिक,इंजीनियरिंग,पीओएच वर्कशॉप आणि पूर्ण मध्य रेल्वेत नाशिक रेल्वे स्थानकाला स्वच्छ रेल्वे स्टेशन हे ५ पारितोषिक प्राप्त झाले. पारितोषिक आणि शील्ड मिळालेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के.यादव यांनी कौतुक केले आहे. सर्वाच्या उकृष्ट कार्याबद्दल हा सन्मान प्राप्त झाल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. यंदा ५ शील्ड मिळाल्या असून यापुढे अजुन जोमाने चांगले कार्य करा यापेक्षा जास्त शील्ड आणि पारितोषिक आपल्या विभागाला मिळतील असे ते म्हणाले.

या प्रसंगी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा,वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गागुर्ड़े ,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा,वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय ) राजेश चिखले, वरीष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टिआरओ )प्रदीप ओक, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजीव दीक्षित, मुख्य कार्यालय अधीक्षक एस.डी. वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी चौधरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound