अवकाळी पावसाचा चोपडा तालुक्यात जोरदार तडाखा; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

chopda 3

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात अवकाळी पावसाने रविवारी संध्याकाळी ५ वाजता मेघ गर्जने सह वादळी वाऱ्यासह काही भागात एक तास काही भागात २०ते ४५ मिनिटे पाऊस पडला शेतकर्‍यांच्या काढणीला आलेल्या मालाचे व गुरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .तालुक्यातील मराठे येथील बुधा कहारु भिल (५०) यांच्या अंगावर वीज पडून ते भाजले गेले आहेत. शेतकर्‍यांचा सध्या गहू, मका,हरभरा,कांदा, दादर, बाजरी काढणीला आली असून अवकाळी पावसामुळे त्यांचे खुप नुकसान झाले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांतील झोपड्यांचेही नुकसान झाले आहे.

 

 

चोपडा तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसला. त्यात काही शेतकऱ्यांचे पॉली हाऊसचे नुकसान झाले तर मोठ्या प्रमाणावर पिकांनाही फटका बसला. चोपडा तालुक्यात शुक्रवारी (१४ एप्रिल) रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यामुळे काही घराचे तसेच गुरांच्या गोठ्याचे पत्र्याचे छत उडाले तर अन्य ठिकाणी पीकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर वादळी वारा सुटला होता. यात लासुर , विरवाडे, वडती, विष्णापूर,वर्डी ,अकुलखेडा, अनवर्डे, बुदगाव येथील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला लासुर या ठिकाणी कांदा रोप तयार करण्यासाठी लावलेले कांद्याचे डोंगळे भुईसपाट झाले.तर ज्वारी,बाजरीचे नुकसान झाले. आंब्यांच्या कैर्‍या वार्‍याने पडल्याने नुकसान झाले. गुरांना साठवून ठेवलेल्या चारा काही ठिकाणी उडून गेल्याने देखील शेतकर्‍यांचे नुकसान झाले. तर तालुक्यात काही भागात वादळी वार्‍यानंतर रिमझिम पाऊस संध्याकाळी सुरू झाला. शेतातून काढलेला कांदा अद्याप काही ठिकाणी साठवणूक सुरू असल्याने शेतात व घराजवळ पडलेला कांदा व गुरांचा चारा झाकण्यासाठी मोठी धावपळ शेतकर्‍याला करावी लागली.

 

c1

 

चोपडा तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागातील गावांमध्ये पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ते वडती ,विषणापूर,विरवाडे,लासुर,वरगव्हान, या गावांमध्ये वादळ वार्‍यासह अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली. विटनेर, वढोदा, घोडगाव,लासुर ,अनवर्डे, बुधगाव, चहार्डी, संपुले, कठोरा भागात वादळामुळे वीज गायब होती. तर लासुर चुंचाळे रस्त्यावर झाडे उन्मडून पडल्याने रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक ठप्प होती .काही ठिकाणी विजेचे पोल् पडल्याने ग्रामीण भागातील विजेचा पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता.तर विजेचे खांब कोसळल्याने तालुक्यातील बिडगाव लासुर अकुलखेडा अशा मोठ्या गावांचे वीजपुरवठा अजूनही बंद आहे.काही घरावरचे पत्रेदेखील उडाले. काही ठिकाणी कांदा साठवणुकीसाठी काढून ठेवला होता त्याचेही नुकसान झाल्याचे कळते. परंतु, काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला.

c2

 

चोपडा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं बस स्थानकची मागील महिन्यातच नवीन पत्रे लावली पण त्यांना व्यवस्थित हुक न लावल्यामुळे संध्याकाळी६वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्याने काही पत्रे उडत होती व हलत होती…नवीन पत्रे बसवायला अजून एक ते दिड महिनेच होत आहेत.आजच्या या जोरदार वाऱ्यामुळे पत्रांचा मोठा आवाज येत असल्याने नागरिक बस स्थानकमध्ये जीव मुठीत धरून बसले होते.

 

c3

Add Comment

Protected Content