Home Cities जळगाव १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन

१८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन

0
114


जळगाव प्रतिनिधी । येथील मु.जे. महाविद्यालय आणि विद्यार्थी विकास विभाजाच्या संयुक्त विद्यमाने १८ तास अभ्यास करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

शनिवारी सकाळी सहा तर रात्री साडेअकरा या कालखंडात विद्यार्थ्यांनी अभ्यास करून अनोख्या पध्दतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. या उपक्रमाला प्राचार्य उदय कुलकर्णी, डॉ. प्रा. सी. पी. लभाणे व राजीव पवार यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, हा उपक्रम संपल्यानंतर रात्री साडेअकराला रेल्वे स्थानकाबाहेर असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound