भुसावळ Bhusawal प्रतिनिधी । माजी आमदार संतोष चौधरी यांच्या विरोधात निवेदन देण्यासाठी पीआरपीच्या पदाधिकार्यांनी ना. जयंत पाटील यांच्या ताफ्यासमोर झोपून त्यांना अडविल्याची घटना आज घडली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil हे आज सायंकाळी परिवार संवाद यात्रेनिमित्त फैजपूर येथून भुसावळ येथे आले. शहरात प्रवेश करतांना महात्मा गांधी चौकाजवळ पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे व पंचायत समिती सदस्या सौ. पुष्पा सोनवणे यांनी त्यांना माजी आमदार संतोष चौधरी Santosh Chaudhariयांच्या विरोधात निवेदन दिले.
याचवेळी पीआरपीचे काही कार्यकर्ते जयंत पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर झोपल्याने काही काळ खळबळ उडाली. शेवटी या सर्वांची समजूत काढण्यात आली असली तरी यातून राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह समोर आला आहे. माजी आमदार संतोष चौधरी व पीआरपीची महामंत्री जगन सोनवणे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.