साकेगावचे ग्रामविकास अधिकारी निलंबीत; निधीत अपहार केल्याचा ठपका

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील ग्रामविकास अधिकारी गौतम आधार वाढे यांनी गावातील कर स्वरुपात जमा झालेली रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात भरणा न करता परस्पर खर्च केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, साकेगाव येथील ग्रामविकास अधिकार्‍याने गावातील कर स्वरुपात जमा झालेली रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात भरणा न करता परस्पर खर्च केला. यात अनियमितता दिसून आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. गौतम आधार वाडे असे निलंबन करण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकार्‍याचे नाव आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सीईओंनी जारी केलेल्या पत्रात वाढे यांनी केलेल्या अपहाराची रक्कम निश्‍चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

गौतम वाढे यांच्यावरील कारवाईने साकेगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.

Protected Content