भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील जोगलखेडे ग्रुप ग्रामपंचायतीला आपल्या कालखंडात विविध कामांना गती देण्यात आली असून आगामी काळातही गावाला आदर्श बनविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन मावळते सरपंच पंकज डिगंबर पाटील यांनी केले आहे. निवडणुकीबाबत भूमिका मांडण्यासाठी दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, जोगलखेडा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये जोगलखेडा आणि भानखेडा या दोन गावांचा समावेश आहे. यात गत पंचवार्षिकमध्ये सरपंच असणारे पंकज डिगंबर पाटील यांच्या सौभाग्यवती उमेदवारी करत आहेत. खरं तर पाटील घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे. पंकज पाटील यांचे आजोबा, वडिल आणि ते स्वत: गावाचे सरपंच होते. तर आता पुढील पंचवार्षिकमध्ये त्यांची पत्नी…या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये मतदान होणार असून जोगलखेडे ग्रुप ग्रामपंचायतीत आपण केलेल्या विकासकामांच्या बळावर ग्रामस्थ पुन्हा आपल्यालाच कौल देणार असल्याचा आशावाद पंकज पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, गावातील काँक्रिटीकरण, हायमास्ट लँप, स्मशानभूमि, गटारी, भूमिगत गटारी, दलीत वस्ती कामे, अंगणवाडी दुरूस्ती, ग्रामपंचायत आवाराचे सुशोभीकरण, जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षण भिंत, गुरा-ढोरांसाठी हौद आदींसह शासनाच्या विविध योजनांची आपण यशस्वी अंमलबजावणी केलेली आहे. याच्या जोडीला पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार आदी मान्यवरांच्या निधीतून अनेक कामे केली आहेत. विशेष म्हणजे परिवहन महामंडळाची बस देखील सुरू करण्यात आलेली आहे. आपण बोलत नसून कामे करतो. यामुळे गावातील जनता माझी सौभाग्यवतीला निवडून देतील. आणि याच्या बरोबरच आमच्या पॅनलला कौल देतील असा आशावाद पंकज डिगंबर पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
आपण आपल्या सरपंचपदाच्या कालावधीत अनेक कामे केली असून भविष्यातही काही कामे करायची आहेत. यात प्रामुख्याने शेळगाव धरणावरून गावासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना आखण्याचे काम आपण करणार आहोत. तसेच भविष्यात देखील याच प्रकारे आपण विकासकामे करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.