अनिल चौधरींना हायकोर्टाचा दणका; अंतरीम जामीन नाकारला

भुसावळ प्रतिनिधी । येथील एका महिलेची ६० लाख ७० हजार रूपयांमध्ये फसवणूक केल्या प्रकरणी येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने अंतरीम जामीन देण्यास नकार दिला आहे.

भुसावळ येथील महिलेची रुपये ६० लाख ७० हजार रुपये घेऊन गाळे खरेदी न देता फसवणूक केल्या प्रकरणी भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांच्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक २३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झालेला होता. त्यामुळे त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अटक पूर्व जामीन साठी अर्ज केलेला होता. दिनांक १८ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यामुळे चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुढे धाव घेतली होती.

दरम्यान, दिनांक २४ मार्च रोजी न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांच्या न्यायासनासमोर झालेल्या सुनावणीत त्यांना एकतर्फी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.

दिनांक १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला तेव्हा पोलिसांना गुंगारा देत अनील चौधरी न्यायालयातून पसार होऊन आज पर्यंत पोलिसांना सापडलेले नाही त्यामुळे आज झालेल्या सुनावणीनंतर ते स्वतः पोलिसांना शरण येणार का पोलीस त्यांना अटक करणार अथवा आता गुन्हा दाखल झाल्याच्या दोन महिन्यानंतरही ते न सापडल्या मुळे पोलिसांकडून त्यांना फरार घोषित करण्याची कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Protected Content