भोरगाव लेवा पंचायततर्फे सामूहिक विवाह सोहळा

भुसावळ प्रतिनिधी । भोरगाव लेवा पंचायतर्फे आज शहरात पाच जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. याचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी चार लेवा पाटीदार तर एक बौध्द जोडप्याने दांपत्य जीवनात पदार्पण केले.

शहरातील संतोषी माता सभागृहात आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून पाच जोडप्यांचे शुभमंगल झाले. यातील चार जोडपी ही लेवा पाटीदार समाजाची तर एक जोडपे हे बौध्द समाजाचे होते. यातील वर आणि वधू हे दोन्हीही दृष्टीहिन होते हे विशेष. दोन समाजांचा एकत्रीतपणे झालेला हा सोहळा लक्षणीय ठरला.

याप्रसंगी लोकेश किशोर कोल्हे (रोझोदा) व राजेश्‍वरी बळीराम चौधरी (पाडळसा), कौतिक सुभाष फेगडे (रोझोदा) विनिता विनोद चौधरी (खिरोदा), अक्षय रवींद्र फेगडे (दीपनगर) व विशाखा विठ्ठल चौधरी( भुसावळ), हर्षल प्रमुख चौधरी (खिरोदा ) व विजया विजय भोसले या जोडप्यांसह रावळगाव येथील वर मंगेश अशोक धीवरे व वधू दीपाली उबाळे पिंपरी या दृष्टिहीन जोडप्यांचा विवाह पार पडला. लेवा समाजातर्फे पंडित राहुल जोशी यांनी वैदिक पध्दतीत विवाह पार पाडला. तर मंगेश धिवरे व दीपाली उबाळे यांचा विवाह बौद्धाचार्य सुनील केदारे यांनी पार पाडला.

या सामूहिक विवाह कार्यक्रमात पार पडलेल्या लग्न सोहळ्यातील नवदांपत्यांना आयोजकांतर्फे १५ हजारांचे संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आले यात गॅसच्या दोन शेगडीसह कुकर, पाण्याची टाकी, मिक्सर, पंखा व इतर साहित्य देण्यात आले.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भोरगाव पंचायत पाडळसेचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, भुसावळ शाखेच्या अध्यक्षा आरती चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, मंगला पाटील, आरती सारंग चौधरी, सुहास चौधरी, डॉ.बाळू पाटील, शरद फेगडे, डिगंबर महाजन, अ‍ॅड. प्रकाश पाटील, अजय भोळे, रघुनाथ चौधरी, महेश फालक, लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेश संघटक रुपेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष श्याम भारंबे, शहराध्यक्ष देवा वाणी यांनी सहकार्य केले.

Protected Content