अपात्रता प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या येथील माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करणारे तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे आणि ११ नगरसेवकांच्या अपात्रता प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. यात काल झालेल्या सुनावणीत ११ नगरसेवकांच्या दोन्ही वकिलांनी आपण आजारी असल्याचे सांगून शुक्रवारची सुनावणी तहकूब करण्याबाबत अर्ज दिला. यामुळे आता पुढील सुनावणी १ जुलै रोजी होणार आहे. ऍड. हरीश पाटील व ऍड. महेश भोकरीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी तहकूब करण्याचा अर्ज दिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, १ जुलै रोजी अपात्रतेच्या मागणीवर अंतीम सुनावणी होणार असून नंतर मग यावर तातडीने निकाल येणार आहे. साधारणपणे निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच हा निकाल येणार असल्याने यात काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content