एमआयडीसीची जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया !

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगावजवळून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गालगत असणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेल्याची घटना आज घडली.

जळगाव औद्योगिक वसाहतीला तापी नदीवरून पाण्याचा पुरवठा होत असतो. यासाठी महामार्गाला लागून मोठी पाईपलाईन गेलेली आहे. काही महिन्यांपूर्वीच ही पाईपलाईन नव्याने टाकण्यात आली आहे. मात्र याचे जोड बरोबर नसल्यामुळे अनेकदा यातून लिकेज होत असते. यातच आज सकाळी साकेगाव बस स्थानकाच्या समोरील जोड तुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. अनेक तासांपर्यंत धो-धो पाणी वाहत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे.

Add Comment

Protected Content