Home Cities भुसावळ भुसावळच्या विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी !

भुसावळच्या विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी !

0
47

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ नगरपालिका हद्दीतील विकासकामांसाठी आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याने पाच कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे.

भुसावळ शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून नागरिक यामुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, भुसावळकरांसाठी दिलासा देणारे वृत्त आहे. आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याने नगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून पाच कोटी रूपयांचा निधी मिळालेला आहे.

या निधीच्या माध्यमातून भुसावळ शहरातील रस्त्यांसह अन्य विकासकामे होणार आहेत. यात प्रामुख्यने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गांधी चौक परिसर, दीनदयाळनगर परिसर, हुडको कॉलनी महादेव मंदिर परिसर, ठाकूरसिंग बाबा मंदिर परिसर, हुडको कॉलनी, अयोध्या नगर, विकास कॉलनी, पियुष कॉलनी, म्युनिसिपल पार्क, प्रभाग १३, प्रल्हादनगर भाग, प्रभाग ४, मेथाजी मळा व परिसर, मरिमाता मंदिर, ताडीचा मळा भाग, जुने सतारे कोळीवाडा, विद्यानगर, काशिराम नगर, न्यू एरिया ब्राह्मण संघ, पोस्ट कार्यालय ते ठाकूर गल्ली, न्यू एरिया वॉर्ड सावकारे गल्लीत रस्ता कॉंक्रिटीकरण, रामेश्वर कॉलनीत, आनंद नगरात, देना नगर, प्रभाग क्रमांक २२, तृप्ती डेअरी आनंद नगर परिसर, सिंधी कॉलनी, आदी रस्ते होणार आहेत.

या कामांमध्ये डांबरीकरण, मुख्य गटारींचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे, पोलिस चौकी बांधकाम, सभागृहाची उभारणी आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे.


Protected Content

Play sound