Home Cities भुसावळ आ. सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नि. तु. पाटलांचा अनोखा उपक्रम

आ. सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नि. तु. पाटलांचा अनोखा उपक्रम

0
47


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या ५३व्या वाढदिवसानिमित्ताने डॉ. नि. तु. पाटील यांनी अनोखा उपक्रम राबविला. याच्या सांगतेला स्वत: आमदार सावकारे हे उपस्थित होते.

आमदार संजय सावकारे यांचा वाढदिवस नुकताच ११ डिसेंबर रोजी पार पडला. याचे औचित्य साधून ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील यांनी विशेष उपक्रम राबविला. याच्या अंतर्गत वरणगाव येथील सुप्रसिद्ध वासुदेव नेत्रालयात द्वारे आमदार संजय सावकारे यांच्या ५३ वाढदिवसाचे औचित्य साधत नेत्र तपासणी फी फक्त ५३ रुपये ठेवण्यात आलेली होती. सदर शिबिर हे दिनांक ११ ते १३ डिसेंबर पर्यंत सुरू होते.

दरम्यान, समारोपाच्या दिवशी आ. संजय सावकारे यांनी संध्याकाळी वासुदेव नेत्रालयात भेट देत आलेल्या रुग्णांशी चर्चा करत त्यांना औषधी वाटली. या शिबिरामध्ये डॉ. सौ रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील नेत्ररुग्णांची तपासणी केली असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
वासुदेव नेत्रालया तर्फे चालवण्यात आलेल्या जनहितार्थ उपक्रमाचे आ. संजय सावकारे यांनी कौतुक करत डॉ. नि. तु. पाटील यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी, तुकाराम पाटील, प्रशांत पाटील, गणेश धनगर, सचिन इंगळे, दीपक फेगडे, वैभव महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीसाठी कपिल राणे,साजन गवळी,गोलू शेख, योगेश मगरे,मझर शेख आदींनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound