पत्नीनेच पतीचा केला खून : परिसरात खळबळ

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चारित्र्याच्या संशयातून त्रास देणार्‍या पतीला पत्नीनेच संपविल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पाचदेवळी येथे घडली आहे.

बोदवड तालुक्यातील पाचदेवळी येथे दगडू पुंडलीक सुरवाडे ( वय ४५) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. मद्यपान केल्यानंतर ते सातत्याने पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय घेत असत. यामुळे पती-पत्नीत नेहमीच खटके उडत होते. यातच रविवारी रात्री असाच प्रकार घडल्याने दोन्हींमध्ये प्रचंड वाद झाले. यातच त्यांची पत्नी अशा दगडू सुरवाडे हिने आपल्या पत्नीवर विळ्याने वार केले. यात ते जागीच गतप्राण झाले. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या संदर्भात मयत दगडू सुरवाडे यांच्या मुलीने वरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकाचे एपीआय आशीषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील हे तपास करत आहेत.

Protected Content