भुसावळात ‘चेतना के स्वर’ स्पर्धा उत्साहात

chetna ke swar bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । येथे ‘चेतना के स्वर’ या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून यात के. नारखेडे विद्यालयाने प्रथम तर ताप्ती पब्लिक स्कुलने द्वितीय क्रमांक पटकावला.

भारत विकास परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे आयोजित या स्पर्धा प्रभाकर हॉलमध्ये उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत विविध शाळेतील सोळा संघ सहभागी झाले होते. यात महाराणा प्रताप विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. भुसावळ स्कूलच्या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप होते. जळगावचे संजय पत्की, कपील शिंगणे,राजेंद्र फुलवाणी हे परिक्षक होते.विजेत्यांना महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
सकाळी स्पर्धेचे उदघाटन खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रोटरी क्लबचे उपप्रांतपाल चेतन पाटील, महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज, भारत विकास परिषदेचे प्रांत सचिव योगेश मांडे, स्थानिक शाखेच्या अध्यक्षा डॉ.नीलिमा नेहेते उपस्थित होते.
दुपारी महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज, राधाकृष्ण हॉटेलचे संचालक बद्रीनारायण अग्रवाल,चेतन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत संयोजक रमाकांत भालेराव यांनी केले.डॉ.निलीमा नेहेते यांनी प्रास्ताविक केले. गौरव हिंगवे व श्रीकांत जोशी यांनी पाहूण्यांचा परिचय करुन दिला.प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी व राधा चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले. तर डॉ. मनीषा दावलभक्त यांनी आभार मानले.

Protected Content