भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रात झालेल्या स्फोटामध्ये एक तरूण जखमी झाला असून त्याच्यावर जळगावात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.
भुसावळ तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र महाजनको कंपनी दिपनगरमध्ये सायंकाळी ब्लास्ट झाल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे. यामध्ये सचिन शिंदे नामक तरुणांच्या अंगावर केमिकल पडल्याने तो जखमी झाला असून भुसावळतील रिदम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जखमीस आणले असून मलम पट्टी करून पुढील उपचारासाठी जळगाव मधील एका खासगी रूग्णालयात रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.