अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील मुंदडा नगर शेजारी असलेल्या कस्तुरा बाग कॉलनीत विश्वेश्वर महादेव मंदीराचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले.
महादेव मंदिर लोकवर्गणीतून उभारण्यात येणार असल्याचा माणस कॉलनी वासीयांनी व्यक्त केला आहे. कस्तूरा बागपासून हाकेच्या अंतरावर संत गजानन महाराज यांचे मंदिर आहे. परिसरात अजून विश्वेश्वर महादेव मंदिराचे निर्माण झाल्यामुळे प्रसन्नता वाढणार आहे. दरम्यान मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी भूमिपूजन सोहळा प्रसंगी दिली आहे.
या भूमिपूजन सोहळ्यात कॉलनीतील योगेश वंजारी, नितेश पाटिल, श्रीराम पाटील, जिजाबारव पाटील, भटू पाटील, दीपक पाटील, सचिन अहिरे, गणेश पाटील, विलास पाटील, किशोर पाटील रमाकांत सैंदाणे, अशोक सैंदाणे, विजय पाटील यांसह कस्तुराबाग कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.