वेदांतामध्ये टक्केवारी कुणी घेतली ते सांगा : अजित पवार

बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वेदांता प्रकल्प हा टक्केवारीच्या मागणीमुळे गुजरातमध्ये गेल्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोपाला आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काल बीकेसी मैदानावरील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यासोबतच महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यात, त्यांनी वेदांता प्रकल्पासाठी टक्केवारी मागण्यात आल्याने हा प्रकल्प बाहेर गेल्याची टीका केली होती. याला आज अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या संदर्भात आज बारामतीमध्ये अजित पवार म्हणाले की, ‘ टक्केवारी मागितली हे धादांत खोटं आहे. कुणी आरोप करत असेल तर त्याने सिद्ध करून दाखवावं. कारण वेदांताबद्दल मी मीडियाला दाखवलं होतं. एक मीटिंग शेवटची झाली होती. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जुलैत मीटिंग झाली होती. सरकार जूनमध्ये गेलं. जुलैत उच्चस्तरी समितीची मीटिंग झाली. त्यात हाच विषय होता. आज त्यांना वेदांता गेला हे त्यांच्या चुकांमुळे गेलंय २ लाख तरुणांचा रोजगार गेलाय. तरुणांचा रोष आपल्यावर येईल, हे लपवण्याकरिता त्यांनी हे वक्तव्य केलंय, असा आरोप अजित पवारांनी केला.

Protected Content