बीएचआर घोटाळा : आ. चंदूलाल पटेल यांचा अटकपुर्व जामीन मंजूर

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळा प्रकरणी आमदार चंदूलाल पटेल यांचा अटकपुर्व जामीन पुणे आर्थीक गुन्हे शाखेच्या न्यायालयाने मंजूर केला आहे. 

राज्यातील बहुचर्चीत असलेले बीएचआर अपहार व घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. यापुर्वी काही दिवसांपुवी मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून अटक केली होती. याच गुन्ह्यात विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर ठेवीदाराच्या पावत्या मॅचींग प्रकरणात नाव असल्याचे आरोप करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून आमदार चंदूलाल पटेल शहरातून गायब होते. या अपहार प्रकरणात अनेक दिग्गज नेते गोत्यात आले आहे. दरम्यान आज आमदार पटेल यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज केला होता. न्या. गोसावी यांनी आ. पटेल यांचा अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे. आ. पटेल यांना १ लाखच्या जातमुचलक्यावर अटकपुर्व मंजूर केला आहे.  

Protected Content