जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर मतदारसंघाच्या खासदार तसेच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींसोबत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील यात्रोत्सवात घडलेल्या छेडखानीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभाग, जळगाव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सदर घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय असून, अशा समाजघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भोरगाव लेवा पंचायतने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हे निवेदन पोहोचवून पुढील कार्यवाही व्हावी, अशी विनंतीही केली आहे.
या प्रसंगी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभागाचे प्रमुख विष्णू भंगाळे, उपप्रमुख डॉ. स्नेहल फेगडे, सचिव प्रा. डॉ. प्रशांत वारके, तसेच पूजा सरोदे, प्रसन्ना झोपे, प्रा. डॉ. प्रमोद चौधरी, प्रकाश वराडे, प्रदीप रोटे, राजेश खडके, मधुकर भंगाळे, सचिन महाजन, महेंद्र पाटील, कुंदन काळे, राजेश वारके, सुरेश अत्तरदे, मिलिंद चौधरी, प्रफुल्ल सरोदे, चंद्रकांत चौधरी, संदीप बोंडे, राहुल चौधरी आदी उपस्थित होते.