रावेर बाजार समितीच्या विविध विकास कामाचा सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बाजार समिती शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झटत असून, बाजार समितीचा विकास करण्यासाठी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहे. बाजार समितीच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याचा आनंद आहे. सभापती सचिन पाटील यांनी विविध विकास कामाच्या भूमीपूजनाप्रसंगी व्यक्त केले.

११ मार्च सोमवार रोजी बाजार समितीकडून दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, भूमिगत पाण्याची टाकी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. तसेच कृषी विकास योजने अंतर्गत १ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाचे लोकार्पण सोमवारी बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, माजी जीप सदस्य रमेश पाटील, तहसिलदार बी. ए. कापसे यांच्या हस्ते कऱण्यात आले.

यावेळी तहसिलदार बी.ए.कापसे, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजार समितीचे संचालक डॉ.राजेंद्र पाटील, उपसभापती योगेश पाटील, माजी जि.प.सदस्य रमेश पाटील, बाजार समिती संचालक योगीराज पाटील, प्रल्हाद पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, पितांबर पाटील, मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, विलास चोधरी, सोपान पाटील, पंकज पाटील, सिकंदर तडवी, जयेश कुयटे, रोहित अग्रवाल, सचिव महाजन, माजी पं स सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, घनश्याम पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते.

या प्रसंगी सभापती सचिन पाटील यांनी सभापती पदाच्या वर्षभराच्या काळात केलेल्या विविध विकास कामांसंबंधी माहिती दिली. यावेळी योगीराज पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील यांनी सचिन पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांनी केले. गोपाळ महाजन यांनी आभार मानले.

Protected Content