खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थीक लुट थांबवा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थीक लुट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची जिलह्यात तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन सुराज्य अभियान संघटनेच्या वतीने जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सण, उत्सव व उन्हाळी सुटीच्या कालावधीत खासगी प्रवाशी ट्रॅव्हल्सकडून भरमसाठ तिकीटदर आकारून प्रवाशांची आर्थीक लूट अजूनही सुरू आहे. यासंदर्भात अनेक संघटनांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदन देण्यात आले. परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२२ रोजी चौकशी करून कारवायाच्या निर्देश देण्यात आले होत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात तप्तरतेने कार्यवाही करावी, शिवाय खासगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जेथून सुटतात तेथे प्रवासांचे दरपत्रक लावावी, तसेच परिवहन अधिकाऱ्यांनी वेळीवेळी जावून प्रवाशांकडून दर आकारणी व्यवस्थित होत आहे की नाही याची चौकशी करावी, होत असलेली प्रवाशांची आर्थीक लुट थांबवावी अशी मागणीचे निवेदन गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना देण्यात आले. याप्रसंगी सुराज्य अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जुवेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content