‘ओ साहेब पैसे घ्या, पण स्वस्त धान्य दुकान द्या’ !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वंचीत बहुजन आघाडीच्या उपोषणाची दखल न घेतल्याने सोमवारी १९ सप्टेंबर रोजी वंचीत बहुजन आघाडीतर्फे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकर्त्यांनी ‘ओ साहेब पैसे घ्या, पण स्वस्त धान्य दुकान द्या!’ अश्या घोषणा देत पाचशे व दोन हजाराच्या नकली नोटा दाखवून नागरिकांचे लक्ष वेधले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यलयाकडून १० ऑक्टोबर २०२१ रोजी रास्त भाव दुकान जाहीरनामा काढण्यात आला होता. यात जुन्या दुकांदारांच्या नातेवाईकांनाच ही स्वस्त धान्य दुकान देण्यात आली असून जुन्या संस्था तसेच बचत गटांना यात डावलण्यात आले आहे. पुरवठा अधिकारी यांनी यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण केली असून हा जाहीरनामा रद्द करावा या मागणीसाठी वंचीत आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी १२ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. दरम्यान त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल न घेतल्याने सोमवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने अनोख आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, जिल्हा महासचिव ललित घोगले, प्रसिद्धी प्रमुख राहुल सुरवाडे, प्रवीण सपकाळे, मनोज अडकमोल, विजय अहिरे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content