मुंबई/पुणे,लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | २०१८ मधील भीमा कोरेगाव प्रकरणी नियुक्त चौकशी आयोगाकडून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय कोरेगाव भीमा चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. या भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडून ६ ते १० जून दरम्यान पुण्यात सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीदरम्यान विभागीय आयुक्त तथा तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना साक्ष देण्यासाठी ६ आणि ७ जून रोजी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहेत. कोरेगाव हिंसाचार काळात सौरभ राव हे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.
तत्कालीन जिल्हाधिकारी राव यांच्यासह भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराच्या वेळी पुणे ग्रामीण पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त वरिष्ठ अधिकारी संदीप पखाले, सेवानिवृत्त तथा तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गणेश मोरे, आणि शिक्रापूर पोलिस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलिस आयुक्त रमेश गलांडे यांनादेखील साक्षीदार म्हणून साक्षी समन्स बजावण्यात आले आहे.
हिंसाचार प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे एन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौकशी आयोगाकडून ६ ते १० जून दरम्यान पुण्यात सुनावणी घेणार येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांना यापूर्वी ९ आणि १० जून रोजी हजर राहण्याचे समन्स होते. त्यात आयोगाकडून बदल झाल्याने पुण्यातील सुनावणीचे वेळापत्रक बदल झाले असून विभागीय आयुक्त राव यांच्यासमवेत सेवानिवृत्त भारतीय लष्करी अधिकारी मानद कॅप्टन बाळासाहेब जमादारयांना देखील साक्षी समन्स बजावले आहे.