रॉबर्ट वाड्रा पॉझिटिव्ह, प्रियंका गांधी आयसोलेट; सर्व प्रचारसभा रद्द

 

नवी दिल्ली:  वृत्तसंस्था | प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रियंका यांची चाचणी निगेटिव्ह आली असली   तरी पतीला कोरोना झाल्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाईन करून घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत.

 

प्रियंका गांधी यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्याने मला आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभा रद्द कराव्या लागत आहेत. काल माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. त्यामुळे मला प्रचाराला येता येणार नाही. तरीही काँग्रेसचा विजय होईल अशी मला आशा आहे, असं प्रियंका यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Protected Content