मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुंबईतील घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात घाटकोपर दुर्घटनेवरुन चांगलेच राजकारण तापलेले आहे. पोलिस प्रशासन गंभीर होताच याप्रकरणातील आरोपी भावेश भिडे बेपत्ता झाला होता. अखेर या बेकायदेशीर होर्डिंगचा मालक भावेश भिंडेला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला राजस्थानमधील उदयपूरमधून अटक केली आहे. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची ७ पथके कार्यरत होती, वेगवेगळ्या भागात भिडेचा पोलिसांकडून शोध सुरु होता, तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार, पोलिसांनी शोध मोहिम राबवली होती.
अपघातातील बचावकार्य १६ मे रोजी गुरुवारी संपले. घाटकोपरमध्ये पडलेले होर्डिंग १०० फूट उंच होते. अनेक गाड्या, दुचाकी आणि लोक होर्डिंगखाली गाडले गेले. या अपघातात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ७५ जण जखमी झाले आहेत.
घाटकोपर दुर्घटनेतील फरार आरोपी भावेश भिडेला उदयपूरमधून अटक
10 months ago
No Comments