भाऊबीजेला ज्ञानदादाकडून संत मुक्ताईला साडी-चोळी !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज भाऊबिजेच्या पवित्र पर्वावर ज्ञानदादा कडून आलेली साडी-चोळी संत मुक्ताईस परिधान करण्यात आली.

बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजेच भाऊबीज होय. हा कार्तिक द्वितिया (यमद्वितीया) हा दिवाळीतला चौथा दिवस हिंदूधर्मीय साजरा करीत असलेला एक महत्वपुर्ण सण आहे. या पवित्र सणाने बहीण भावाचे नाते जपत आळंदी संस्थान कडुन म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊलींकडुन बहीणीस म्हणजेच संत मुक्ताबाई ला दिवाळी व भाऊबीजेची भेट म्हणून साडी, चोळी आली होती.

ही साडी चोळी बुधवारी भाऊबीज मुहूर्त दि.१५ नोव्हेंबर रोजी विधिवत पुजा करुन जूनी कोथळी समाधी स्थळ मंदिरात आदीशक्ती मुक्ताबाईस नेसविण्यात आली. तर आपेगाव येथील आलेली साडी चोळी नवीन मुक्ताई मंदीरात आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांना नेसविण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थानचे अध्यक्ष ऍड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांच्यासह हभप. रविंद्र महाराज हरणे, गोकुळ चौधरी, आपेगाव संस्थानचे ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर ,भागवत पाटील यांचेसह आपेगाव येथील इतर मंडळी तसेच पुरुषोत्तम वंजारी,ज्ञानेश्वर हरणे, राम जुनारे आदी मान्यवरांसह भाविक उपस्थित होते.

Protected Content