भरधाव डंपरचे अपघातात दोन तुकडे : भीषण अनर्थ टळला !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात अवैध गौण खनिज तसेच वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू असून वाळू वाहून नेणार्‍या भरधाव डंपरचे अपघातात दोन तुकडे झाल्याची घटना यावल ते फैजपुरच्या दरम्यान घडली आहे.

यावल-फैजपुर रोडवर सकाळच्या सुसाट वेगाने धावणार्‍या अवैद्य गौण खनिजची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरचा भिषण अपघात झाल्याची माहीती प्राप्त झाली असुन हा अपघात ईतका भिषण आहे की यात डंपरची दोन तुकडे झाले आहेत., मात्र या अपघातात जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त मिळाले आहे . यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर रात्रीच्या वेळीस भरधाव वेगाने धावणार्‍या डंपराव्दारे किंवा ट्रॅक्टर व्दारे अवैद्य वाळुची वाहतुक करण्यात येत असुन, या अवैद्य गौणखनिज माफीयाशी काही प्रशासकीय मंडळीचा सहभाग असल्याचे चर्चा मागील काही दिवसापासुन परिसरात दबक्या सुरात होत आहे.

दरम्यान, यावल फैजपुर मार्गावरील ढाके वकील यांच्या शेताजवळच्या पुढील वळणावर आज दिनांक ३१ मार्च रविवार रोजी पहाटे ३ते ४ वाजेच्या सुमारास यावल ते चितोडा रस्त्या दरम्यान वाळुची वाहतुक करणार्‍या एका चार चाकी डंपरचा भिषण अपघात झाल्याची माहिती मिळाली असुन ,या अपघातात डंपरचा वेग ईतका होता की यात डंपरचे दोन तुकडे झाले आहे.

या मार्गावरील सकाळच्या सुमारास मोठया संख्येत अनेक नागरीक महिला पुरुष हे वॉकिंग करण्यासाठी जात असतात सुदैवाने अपघात ठीकाणी कुणी ही वॉकिंगला जाणारे पादचारी मिळून आले नाही अन्यथा या अपघातात मोठी जिवितहानी झाली असती,तरी महसुलच्या वरिष्ठांनी या संदर्भात दक्षता घेत अशा प्रकारे होणार्‍या अवैद्य गौण खनिजची वाहतुकीस पायबंद करावे अशी मागणी होत आहे .

Protected Content