चोपडा प्रतिनिधी । येथील भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण व शहर मंडळातर्फे राज्यातील ७२ लाख वीज जोडण्याचा पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा. यासाठी शहरातील जुन्या शिरपूर रस्त्यावरील महावितरण कार्यालयात विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणिस हनुमंतराव महाजन,चंद्रकांत धनगर, बापूराव पाटील,कूउबा संचालक धनंजय पाटील, दिनेश जाधव, पिंटू पावरा, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, हेमंत पाटील,शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष तुषार पाठक, विजय बाविस्कर, गोपाल पाटील, भूषण महाजन, सुनील सोनगिरे, हेमंत जोहरी , प्रकाश पाटील, सुभाष कोळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते