भारत विकास परिषदेतर्फे वर्डीकरांना आरोग्यविषयक साधने भेट; देवदूतांचा सत्कार

चोपडा प्रतिनिधी | तालुक्यातील वर्डी येथील प्रशिक्षणार्थी विमान अपघातात मदत करणार्‍यांच्या सत्कारासह तेथील जनतेला आरोग्यासाठी आवश्यक असणार्‍या साधनांची मदत भारत विकास परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.

समर्थ सुकदेव बाबा समाधी मंदीरांच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष चोपडा ता रा. स्व संघचालक डॉ. मनोज जी . साळूंखे, प्रमुख पाहूणे म्हणून माजी व्हा. चेअरमन चोपडा सह.साखर कारखाना, चोपडा पिपल्स बॅकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांचेसह सरपंच बबीता धनगर, पोलीस पाटील पदमाकर पाटील, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष उज्वल चौधरी, उपाध्यक्ष राधिका नारखेडे, प्रकल्प प्रमुख डॉ. योगेश पाटील, सत्कारार्थी माउली विमलबाई भिल यांची उपस्थीती होती. 

यावेळी मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देउन करण्यात आला. भारत विकास परिषदेचे कार्य विषयावरची चित्रफित यावेळी दाखवण्यात आली. भारत विकास परिषदेने अपघातानंतर धडा घेत पुढे कोणतीही अडचण येवून नये म्हणून दोन स्ट्रेचर, मेडीकल किट बॉक्स, वर्डी वासीयांना सप्रेम भेट दिले. तसेच माउली विमलबाई यांना सौर कंदील, साडीचोळी व पोषक आहाराची ओटी देऊन तर शहरातील ऐश्वर्य सोडून मायभुमीचे पांग फेडणा-या व अपघातानंतर महत्वाची भुमिका निभावणा-या डॉ कांतिलाल पाटील यांचा शाल व श्रीफळ, आणि युवाशक्तीला प्रेरणा देण्यासाठी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून हदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. चंद्रहासभाई गुजराथी यांनी या उपक्रमाचे कौतुक करतांना भारत विकास परिषदेचा हा सन्मान हदयस्पर्शी असल्याचे सांगितले तर डॉ मनोज सांळुखे यांनी ही मदत उपयुक्त असून परिषदेकडून आगामी काळात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अहिराणी भाषेतून विमलबाईंनी घटनेचे वर्णन केले तर युवाशक्तीने मनोगतातून आगामी काळातही ही सेवा अविरत सूरू ठेवण्याचे आश्वासन दिले. 

डॉ कांतीलाल पाटील यांनी वर्डीवासियांना या साधनांची गरज होती व उपयुक्तता किती मोठी भेट परिषदेने दिली असल्याचे सांगत आभार मानले.कार्यक्रम सुरू असतानाच विलक्षण योगायोग घडून आला तो असा खमी पायलट अंकीता गूजर यांनी सर्व ग्रामस्थाचे आभार मानण्याकरिता फोन केला तो ह्याच कार्यक्रमादरम्यान आपल्या प्रतिनिधी मार्फत साडीचोळी व ११००/- भेट दिली व संपुर्ण बरी झाल्यानंतर भेटीला येण्याचे आश्वासन दिले. सुत्रसंचालन उमेश पाटील, राहूल कुळकर्णी यांनी तर आभार डॉ योगेश पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी तुषार तोतला, डॉ. सुरेश अग्रवाल, प्रशांतगुजराथी, डॉ. राहूल मयुर, राजीव नारखेडे , सुप्रिया तळेले यांचेसह परिषदेच्या कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content