हाती मशाल घेऊन राहूल गांधी महाराष्ट्रात दाखल

नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा रात्री नऊ वाजेच्या सुमारास तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल झाली. देगलूर येथे या यात्रेचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानिमित्त मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले. हाती मशाल घेऊन राहूल गांधी यांनी हजारोंच्या उपस्थितीत महाराष्ट्रात प्रवेश केला. यानंतर राहूल गांधी यांनी उपस्थितांना संबोधीत करतांना आपल्या भाषणाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने केला. याप्रसंगी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली.

कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा विविध राज्यांमधून आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राज्यात पुढील दोन आठवड्यांमध्ये राहूल गांधी हे राज्यात राहणार असून या दरम्यान ते ३४४ किलोमीटर पायी चालणार आहेत. महाराष्ट्रातील नांदेड, वाशिम, अकोला, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. यानंतर भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे. या दरम्यान नांदेड आणि शेगाव येथे राहूल गांधी यांच्या सभा होणार आहेत.

Protected Content

%d bloggers like this: