अमळनेर (प्रतिनिधी) पर्यावरण मित्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी भालचंद्र सनेर उर्फ संदीप सनेर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
भालचंद्र सनेर यांनी आता पर्यंत केलेल्या पर्यावरणीय कार्याची दखल घेवून तसेच पर्यावरण मित्र संघटनेच्या अंतर्गत यापुढे ही रक्षणाचे कार्य करण्यासाठी सदरची निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी,विविध संघटनेचे पदाधिकारी व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय मार्गदर्शक प्रा.दिपक भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक देवा तांबे यांनी ही निवड जाहीर केली आहे.