राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी भाग्यश्री ठाकरे यांची नियुक्ती!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने युवतींच्या सक्षमीकरणावर भर देत, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष पदावर कु. भाग्यश्री विवेक ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाची ध्येयधोरणे आणि सरकारच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून युवतींमध्ये पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी भाग्यश्री ठाकरे आता सक्रियपणे काम करतील.

जळगाव येथे गुरुवार, ३ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अँड. संध्या सोनवणे यांच्या संमतीने भाग्यश्री ठाकरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री व पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार अनिल पाटील, पक्षाचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार आणि महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

सर्वस्तरातून नियुक्तीचे स्वागत
भाग्यश्री ठाकरे यांच्या नियुक्तीचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले आहे. आमदार कैलास पाटील, दिलीपतात्या सोनवणे, प्रदेश सरचिटणीस लतिफजी तांबोळी, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, प्रदेश सरचिटणीस व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रवींद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, युवतीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक अभिलाषा रोकडे, महिला शहराध्यक्षा मीनलताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, रावेर लोकसभा युवक अध्यक्ष अरविंद चितोडिया, महिला कार्याध्यक्षा लता राठोड, युवती काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी आणि विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, कार्याध्यक्ष अश्विन सुरवाडे यांनी भाग्यश्रीला शुभेच्छा दिल्या.

संध्याताई भारावल्या…
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अँड. संध्या सोनवणे यांना युवतींनी एक खास भेट दिली. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थी सचिव ते नायगाव ग्रामपंचायतच्या सदस्य आणि अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतच्या त्यांच्या वाटचालीचे सुरेख वर्णन करणारी एक फोटोफ्रेम नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कु. भाग्यश्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार करून संध्या सोनवणे यांना भेट म्हणून देण्यात आली. ही कल्पक भेट पाहून संध्याताई सोनवणे अक्षरशः भारावल्या आणि त्यांनी ही भेट काळजीपूर्वक जपून ठेवणार असल्याचे सांगितले.

माजी आमदार व पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष मनीषदादा जैन यांनी भाग्यश्री ठाकरे ही पत्रकारिता क्षेत्रातील परिचित विवेक ठाकरे यांची कन्या असून, तिला राजकीय व सामाजिक कार्याचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून तिच्या धडाकेबाज कामाच्या जोरावर एका आत्मविश्वासू युवतीला पक्षाने संधी दिल्याची भावना व्यक्त केली.