जळगाव, प्रतिनिधी | पवईतील रेनाझिंस अँड कन्व्हेंशन सेंटर हॉटेलमध्ये जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ऑल इंडिया चेस फेडरेशन व मुंबई चेस असोसिएशनने १ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर या कालावधीत केले आहे. जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत १४ मुलींच्या वयोगटात गो.से. हायस्कूलची भाग्यश्री पाटील ने पाचव्या फेरीअखेर तीन विजय एक बरोबरी व एक पराभव असे साडेतीन गुण मिळवून आपले आव्हान कायम ठेवले आहे.
पाचव्या फेरीत भाग्यश्रीने रोमेनियाची कॅंडिडेट मास्टर ओबादा एमा सोबत बरोबरी केली. जागतिक युवा स्पर्धा पहिल्यांदाच भारतात होत आहे. त्यात ६५ देशातील ३५० स्पर्धक व भारतातील १५० स्पर्धक असे पाचशे खेळाडूंचा सहभाग आहे. यात १४, १६, १८ मुलं व मुली असे ६ वयोगटात विभागणी झाली आहे. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य सरकारचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. भाग्यश्री पाटीलच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष अतुल जैन, पीटी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, सचिव महेश देशमुख, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, शाळेचे मुख्याध्यापक एच. डी. पाटील यांनी अभिनंदन केले. भाग्यश्रीला शाळेचे क्रीडाप्रमुख राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक नरेंद्र पाटील व स्थानीक प्रशिक्षक विवेक दाणी, प्रशांत कासार , भरत अमले, सोमदत्त तिवारी, हार्दिक मेहता, परेश देशपांडे, प्रशांत पाटील, जॉन निकोलस आणि प्रविण ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.