Home क्रीडा महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेंत भाग्यश्री फंड विजयी

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेंत भाग्यश्री फंड विजयी


पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या भाग्यश्री फंडने बाजी मारली असून तिने मानाची गदा स्वतःच्या नावावर केली आहे. अंतिम सामन्यात भाग्यश्री फंड आणि अमृता पुजारी यांच्यात झालेल्या सामन्यात भाग्यश्रीने २-४ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे रामदास तडस इनडोर स्टेडियममध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

मानाची गदा उचलल्यानंतर भाग्यश्री फंडने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना कुटुंबियांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. ती म्हणाली, पहिली ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल आनंद वाटतो. माझे आई-वडील, पती, सासू-सासरे या सर्वांचा माझ्या यशात मोठा हातभार राहिला आहे. पैलवानांना किती कष्ट करावे लागतात, हे पैलवानांचा कळतात. जे पराभूत झाले त्यांचीही तेवढीच मेहनत असते. खेळात हार-जीत होत राहते.


Protected Content

Play sound