आदर्श शेतकरी पुरस्काराने भगवान पाटील सन्मानित

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील प्रगतशील शेतकरी भगवान पाटील यांना जिल्हा परिषदेच्या आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दहिगाव ता यावल येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांना जिल्हा परिषद मार्फत २०००ते २०२१व २२  या वर्षाकरिता आदर्श शेतकरी पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांच्या हस्ते गौरव सन्मान  पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे दालनात ३१ मार्च २०२२ रोजी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. भगवान पाटील यांनी शेती व्यवसायाच्या विपरीत परिस्थितीत पंचक्रोशीत शेती व शेतीपूरक व्यवसायात जिद्दी व परिश्रमाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना जिल्हा परिषद योजनेअंतर्गत कृषी विभाग तर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, पंचायत समितीचे मावळते उपसभापती योगेश भंगाळे, कृषी अधिकारी डी. पी. कोते, कृषी अधिकारी किशोर देवराज, कृषी विस्तार अधिकारी डी. एस. हिवराळे , पंचायत समितीचे मावळते गटनेता शेखर पाटील, सागर पाटील, विजय मोरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान पाटील व त्यांच्या पत्नी उषा पाटील यांना सपत्नीक गौरवण्यात आले, पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन व गावपरिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

 

Protected Content