शहरात श्री भगवान परशुरामांची भव्य शोभायात्रा

WhatsApp Image 2019 05 07 at 8.17.38 PM

जळगाव (प्रतिनिधी ) श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त जळगाव जिल्हा भगवान परशुराम सेवा संघ, ब्राह्मण सेवा संस्था, ब्रह्मश्री बहुउद्देशिय संस्था, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, बी.बी.एन.आणि अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्रेला महाबळ चौकापासून सुरुवात होऊन मायादेवी मंदिर, काव्यरत्नावली चौकमार्गाने शोभायात्रेचे प्रस्थान झाले. याप्रसंगी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष ॲड. सुशिल अत्रे, ब्राह्मण संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी अशोक जोशी, रमाकांत वैद्य, चंद्रकांत वैद्य, अनिल अभ्यंकर, नशिराबादचे उपसरपंच किर्तीकांत चौबे, ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष नितीन कुळकर्णी, ब्रह्मश्री, बहुउद्देशीय संस्थेचे महिला अध्यक्ष रेखा कुळकर्णी, जळगाव जिल्हा भगवान परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष भूपेश कुळकर्णी, बी.बी.एन.बिझनेस नेटवर्कचे प्रशांत महाशब्दे, दीपक साखरे, सतीश शर्मा, निरंजन कुळकर्णी मान्यवरांच्याहस्ते भगवान परशुरामांच्या मिरवणुकीचे पूजन व आरती करण्यात आली.

WhatsApp Image 2019 05 07 at 8.17.41 PM

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी ह.भ.प. दादामहाराज जोशी, हभप मंगेश महाराज, अशोक साखरे गुरूजी, रेखाताई कुळकर्णी, विद्याताई धर्माधिकारी, रवींद्र जोशी, दिनकर जेऊरकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह भुपेश कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी भूषण मुळे, संकेत तारे, तेजस जोशी, अनंत देसाई, गजानन जोशी, किरण कुळकर्णी, दिनेश कुळकर्णी, अविनाश जोशी, श्रीकांत तिवारी, रोहन जोशी, संजय हांडे, विजय देशपांडे, दीपक तांबोळी, संग्राम जेऊरकर, निरंजन कुळकर्णी, मीना नाईक, रुपाली कुळकर्णी, अंजली हांडे, स्नेहा नाईक, सोनल नाईक, स्वाती कुळकर्णी, वैभव नाईक, दीपाली कुळकर्णी, वैशाली कुळकर्णी, सविता कुळकर्णी, गजनन जोशी, किरण जोशी, प्रदीप जोशी, अजय कुळकर्णी, अजय जोशी, हर्षल जोशी, नाना मुळे, अशोक कुळकर्णी, मनोज शर्मा, उल्हास नाईक, सोहम नाईक, राम जेऊरकर यांनी परिश्रम घेतले.

श्री भगवान परशुरामांची भव्य मुर्ती
या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री भगवान परशुरामांची भव्य मुर्ती होती. या मिरवणुकीत लहान बालकांनी भगवान परशुराम, श्रीमंत बाजीराव पेशवे, राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. मिरवणुकीत घोडे, ट्रॅक्टर, चित्ररथाचा समावेश होता. चित्ररथाची निर्मिती प्रसिद्ध आर्टिस्ट सचिन चौघुले यांनी बाजीप्रभू देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टीळक यांचे सुंदर देखावे साकारले होते. तसेच या देखाव्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

आकर्षक पारंपरिक ढोलपथक
आकर्षक पारंपरिक ढोलपथकाने या मिरवणुकीची शोभा वाढविली. तसेच रामदासी ग्रुप व जयश्री राम मित्र मंडळातर्फे मिरवणुकीत ठिकठिकाणी शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. मायादेवी मंदिर येथे भगवान परशुरामांच्या मायादेवी मंदिराचे विश्वस्त मनोज महाराज यांनी प्रतिमेची आरती करुन माल्यार्पण केले. याप्रसंगी शहराचे आ. सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, सभापती जितेंद्र मराठे, जि.प.समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, रवींद्र बादरे यांनी शुभेच्छा दिल्यात.

WhatsApp Image 2019 05 07 at 8.17.40 PM

Add Comment

Protected Content